पथारी, हातगाडी, टपरी धारकाने दाखवलेला विश्वास सार्थ करणार – काशिनाथ नखाते (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीची निवडणूक २० ऑक्टोबर रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत शाळांमध्ये झाली. (PCMC)
यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले. महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यांचे अभिनंदन करत काल रात्री जल्लोष केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्थापनेपासून आजपर्यंत आयुक्ताच्या नियुक्तीने समितीचे सदस्य नियुक्त करण्यात येत होते मात्र पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदासाठी ८ सदस्यांची निवडणूक झाली.
यामध्ये सुमारे 22 वर्षापासून पथारी, हातगाडी, टपरी धारकांसाठी काम करणाऱ्या संघटना महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे नेतृत्वात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले या संघटनेने पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी हॉकर झोनची निर्माण निर्मिती केली आणि त्याचबरोबर फेरीवाल्यांच्या परिवर्तनासाठी मेहनत केली त्यामुळे शहरातील सुमारे २०१२१ मतदारानी भरघोस मते देऊन पॅनलच्या ६ उमेदवारांना बहुमताने विजयी केले.
पहिल्याच वेळेला हा विजय झाल्याने महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका समितीमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन झालेले आहे, यामध्ये या उमेदवाराचा समावेश असून संगीता दत्तात्रय शेरखाने या केवळ ३७ मताच्या फरकाने त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला मात्र त्यांनाही अंगठा मारल्याचे मते बाद ठरवण्यात आले अन्यथा तोही उमेदवार विजयी झालेला होता.
पिंपरी चिंचवड शहरातील तमाम पथारे हातगाडी टपरीधारकानी माय बाप मतदारांनी दाखवलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ करू असे मत काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.
विजयी उमेदवार
पॅनल प्रमुख – काशिनाथ नखाते
सर्वसाधारण गट –
किरण श्रीधर साडेकर
सर्वसाधारण गट –
राजू विलास बिराजदार
अनुसूचित जाती गट –
प्रल्हाद रामभाऊ कांबळे
अनुसूचित जमाती गट –
किसन रामा भोसले
अल्पसंख्यांक गट –
सलीम डांगे
विकलांग गट– अलका सुनील रोकडे
प्रचारासाठी केवळ पाच दिवस मिळालेले असतानाही आमच्या मोठ्या प्रमाणात पॅनल ला विजयी केल्यामुळे नक्कीच आमच्यावर जबाबदारी वाढलेली असून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण एक मनाने एक दिलाने पथारी,हातगाडी, टपरीधारकांसाठी मोठ्या प्रमाणात काम करू असा विश्वास सर्व विजयी उमेदवारांनी व्यक्त केला.
पाच दिवस अहोरात्र मेहनत करून प्रचार करून सर्व उमेदवारांना उमेदवार विजयी केल्याबद्दल महासंघाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे या रॅलीच्या दरम्यान हार्दिक आभार व्यक्त करण्यात आला.