Junnar (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालय व रोटरी क्लब जुन्नर (Junnar)शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यान महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते विठठल कांगणे सर यांचे आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी करताना म्हटले की ‘आजच्या युवापिढीला योग्य अशा मार्गदर्शनाची खरी गरज असून आमच्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसह विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पाहुण्यांचा परिचय रोटरी क्लब जुन्नरचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी, समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते, प्रबंधक मनिषा कोरे व रोटरी क्लबचे सचिव दत्तात्रय म्हस्के, विनायक कर्पे, तुषार लाहोरकर, चेतन शहा तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते विठ्ठल कांगणे हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खास आपल्या शैलीत म्हणाले की ‘आजच्या युवापिढीला जीवनात मोठं यश मिळवायचे असेल तर पहिल्यादा इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मिडिया व मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवा. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा, अभ्यासात सातत्य ठेवा व आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून नक्कीच तुम्ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल .दुसऱ्यांचे स्टेट्स ठेवण्यापेक्षा स्वतःचे स्टेट्स प्रथम बनवा. ही दुनिया तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र तरुणाईने कॉलेज जीवनाचा आनंद घेताना स्वतः च्या भविष्याचा वेध घेण्यासाठी तयारी आतापासून केली पाहिजे. वेळेचे योग्य व्यवस्थापन व उत्तम मार्गदर्शन आणि स्वतः नोटस काढून जीव ओतून अभ्यास करण्याची तयारी ठेवाल तर तुमचं भविष्य नक्कीच उज्वल असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धा परीक्षेच्या व्याख्यानास कॉलेजची दोन ते अडीस हजार विद्यार्थ्यांसह व अनेक मान्यवर मंडळी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल कांगणे यांनी आपल्या खास ग्रामीण व विनोदी शैलीने मुलांना मार्गदर्शन करताना शाब्दिक चिमटे काढत वास्तव्याची जाणीव करून देऊन हसतखेळत मनोरंजन ही केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कांगणे सरांच्या व्याख्यानास भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वर्षा देसाई यांनी केले तर आभार दत्तात्रय म्हस्के यांनी मानले.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा