Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास पिंपरी चिंचवड मधून पाच हजार...

PCMC : भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास पिंपरी चिंचवड मधून पाच हजार नागरिक जाणार – सदाशिव खाडे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेला सावरगाव घाट, ता. पाटोदा, जि. बीड येथील दसरा मेळावा देशात प्रसिद्ध आहे. प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेली परंपरा पुढे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन वंचित ऊसतोड कामगारांसाठी चालू ठेवली. मुंडे साहेबां नंतर पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा यशस्वीपणे पुढे चालू ठेवली आहे. (PCMC)

हा देशातील सर्वांत मोठा दसरा मेळावा ठरलेला आहे. शनिवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या दसरा मेळाव्याला पिंपरी चिंचवड शहरातून पाच हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहर दसरा कृती समितीच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, राजू दुर्गे तसेच संजय मंगोडेकर, गणेश वाळुंजकर, अण्णा गर्जे, दीपक नागरगोजे, भागवत खेडकर, नंदू भोगले, ज्ञानेश्वर नागरगोजे आदी उपस्थित होते. (PCMC)

या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश व देशभरातून भगवान बाबांचे भक्त व मुंडे साहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन वंचित व ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे समाज उपयोगी काम गेल्या ३० वर्षांपासून या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून केले आहे. तीच परंपरा या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत. या वर्षीच्या दसरा मेळाव्याला सर्व समाज घटकातील लोक वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित व देशातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

भगवान भक्ती गडावर १२ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याला पिंपरी चिंचवडकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मोरेश्वर शेडगे यांनी केले. केशव घोळवे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय