Thursday, November 21, 2024
Homeराष्ट्रीयGood news : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,...

Good news : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज ठाकरे ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करून संपूर्ण मराठी भाषिकांना आनंद वार्ता दिली आहे. (Good news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे.

देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.

कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत.

अभिजात भाषा म्हणजे भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना असला पाहिजे.

मराठी ही प्राचीन काळापासून समृध्द अशी हजारो ग्रंथ संपदा असलेली अतिशय समृध्द भाषा आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे दरवर्षी २५० कोटी रुपयांचे अनुदान मराठी भाषा विकास, समृध्दी आणि साशोधनासाठी केंद्र सरकार कडून मिळणार आहे. (Good news)

यामध्ये भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील साहित्य प्रसार करणे, तसेच देशभरात विद्यापीठांमार्फत भाषेचा प्रचार-प्रसार करणे यांसाठी वित्तीय मदत मिळते.
अभिजात भाषा मिळालेल्या भाषांच्या विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होतात. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज’ स्थापन केले जाते आणि विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अध्ययनासाठी विशेष केंद्रे उभारली जातात. भारतातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय केली जाणार आहे. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद होणार आहे, ज्यामुळे भाषेचा अभ्यास व्यापक होईल.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं राज ठाकरे यांनी अतिशय मनापासून अभिनंदन केलं आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती, अशी राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांचा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’ ही होती. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे, त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय