चिंचवड प्रवासी संघाने दिली शपथ (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड रेल्वे स्थानकावर प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड प्रवासी संघ, स्व.श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकांचे फलाट, आरक्षण केंद्र व पश्चिमेकडील टिकीट घर व परिसरात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. (PCMC)
चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता व शपथ सोहळा पार पडला.
यावेळी प्रतिभा महाविद्यालयाचे प्रा.सुखलाल कुंभार, प्रा.सुप्रिया गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, तसेच, स्व.श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशनच्या निर्मला माने, दादासाहेब माने समवेत चिंचवड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक आर.के.तांबे, कर्मचारी मनोहर बोडके, अरविंद कुमार, किरण लगड उपस्थित होते.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी शपथ देवून आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, आपण ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो.
त्याप्रमाणे पुणे-लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानके, लोकल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवण्याचे प्रवासीयांना व शहरवासियांना आवाहन केले.
प्रा. सुखलाल कुंभार म्हणाले, कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिपक शहा तसेच, प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्या क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांना शहरात विविध ठिकाणी स्वच्छता आदी उपक्रमात नेहमीच प्रोत्साहन देतात. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ केल्याबद्दल विशेष आभार मानले.