Akshay Shinde : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्रावामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. शिंदेच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. शवविच्छेदन प्रक्रियेला जेजे रुग्णालयात तब्बल सात तास लागले आणि जेजे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांच्या पॅनलनं अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलं आहे.या प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे.
मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अहवालानुसार, अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी लागल्यानं त्याचा तात्काळ मृत्यू झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार केलं होतं. या चकमकीत शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणात गोळी झाडली, असा दावा पोलिसांनी केला आहे.
अक्षयच्या कुटुंबीयांनी मात्र या चकमकीवर संशय व्यक्त केला आहे. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केला आहे की, या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला आहे. या कथित चकमकीबाबतही पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. या आरोपांवर तातडीची सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांनीही या एन्काउंटरवर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विचारलं की, “कुणालातरी वाचवण्यासाठी हा एन्काउंटर झाला का?” अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे. तसेच संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज गायब का आहे, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काऊंटर करेल, अशी टीकाही संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे. राऊतांच्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Akshay Shinde
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ