Tuesday, October 8, 2024
Homeराज्यUttar Pradesh: उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा...

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू , पहा व्हिडीओ

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्टसगंज परिसरात एक भरधाव बस पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 44 प्रवासी जखमी झाले असून, एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात छत्तीसगडहून बिहारकडे जात असताना मार्कुंडी खोऱ्यात शुक्रवारी घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. बसमध्ये एकूण 65 प्रवासी होते, या दुर्घटनेत 44 प्रवासी जखमी झाले असून, एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस छत्तीसगडहून बिहारच्या गया येथे जात असताना मार्कुंडी खोऱ्यात हा अपघात झाला.पोलिसांनी अपघातस्थळी तात्काळ धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती पोलिसांनी कुटुंबियांना देण्यात आली.

अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Uttar Pradesh

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय