Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते २३ सप्टेंबर...

PCMC : नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६ हजार ५३८ दाखले काढण्यात आले

पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६ हजार ५३८ दाखले काढण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. (PCMC)

महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने आदी सेवा प्रदान केल्या जात आहेत. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरण्यात येतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात.

७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी लांबच लांब रांगा लावायची गरज नाही तसेच प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही मारण्याची आवश्यकता भासत नसल्याने वेळेचीही बचत होते.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत महापालिकेच्या वतीने एकूण ९४ नागरी सुविधा केंद्रे उभारण्यात आली असून दाखले काढण्यासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक या केंद्रांवर जाऊन आवश्यक दाखले काढत आहेत.

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत विविध दाखले देण्यात आले आहेत. यामध्ये भाडेकरू नोंदणी, रसवंतीगृह चालू करण्याकरिता परवाना, अग्नि वर्दी प्रमाणपत्र (फायर अटेंडन्स सर्टिफिकेट), एल. पी. जी बॅक रेटीक्युलेशन यंत्रणा, नवीन नळजोड देणे, हॉटेल नुतनीकरण, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन परवाना नुतनीकरण करणे, नळ कनेक्शन बंद करुन अनामत परत करणे, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन परवाना देणे (१ ते १० बेड ), सिनेमागृह नुतनीकरण, ड्रेनेज बांधकाम परवानगी ना हरकत दाखला देणे, पेट्रोल पंप ना हरकत दाखला, महापालिका हॉल व मैदाने भाड्याने देणे, अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करणे, इमारत प्लॅन मंजुरी तात्पुरता ना हरकत दाखला, झोपडी हस्तांतर करून फोटो पास, उद्योग धंदा परवाना नुतनीकरण, जल निस्सारण जोडणी देणे, कायमस्वरूपी नळ कनेक्शन बंद करणे, साठा परवाना तसेच

पाणीपुरवठा व बांधकाम पूर्णत्वासाठी ना हरकत दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे, जाहिरात फलक उभारणीसाठी वृक्ष संवर्धन ना हरकत दाखला, पेट्रोल पंप नुतनीकरण करणे, मालमत्ता कर उतारा, नळ कनेक्शन हस्तांतर करणे, वृक्षसंवर्धन अनामत परतावा, भोगवटा प्रमाणपत्र, मांडव व स्टेज परवाने,विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे,बांधकाम परवानगी मुदत वाढ देणे, अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला, ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वाचा दाखला, झोन दाखला, तात्पुरते किंवा कायमस्वरुपी नळजोडणी खंडीत करणे, कंपन्या तसेच कारखान्याचे ना हरकत दाखले, रॉकेल ना हरकत दाखला, व्यवसाय परवाना, खाद्य नोंदणी प्रमाणपत्रकारिता नागरी स्थानिक संस्थेचे आरोग्य विषयक ना हरकत प्रमाणपत्र आदी दाखल्यांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय