पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा व इंद्रायणी या तीन नद्यांच्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बांधकामापैकी अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेकडून मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजीपासून कारवाई सुरु करण्यात आली. (PCMC)
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्वप्रथम अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई सुरु केली असून मंगळवारी महापालिकेच्या ब, ड, इ क्षेत्रीय कार्यालयामधील तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात आली. यापुढे संपुर्ण बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी करण्यात आली ‘कारवाई’
महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५५०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान कारवाईसाठी उपस्थित होते. त्यासोबतच कारवाईसाठी २ जेसीबी वापरण्यात आले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ११ अनधिकृत वीटबांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,००० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. याकारवाईसाठी क्षेत्रीय अधिकारी, ३ अतिक्रमण अधीक्षक, ८ बीटनिरीक्षक, १० पोलीस कर्मचारी व १५ मजूर उपस्थित होते. याकारवाईसाठी २ जेसीबी, १ ट्रॅक्टर ब्रेकर अशी यंत्रणा उपस्थित होती. याचबरोबर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये, १० अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,४०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. यासाठी ४ क्षेत्रीय अधिकारी, १ अतिक्रमण अधीक्षक, ६ बीटनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी व १५ मजूर त्याबरोबर, याकारवाईसाठी २ जेसीबीची यंत्रणा वापरण्यात आली.
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ