Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : निगडी पोलीस स्टेशन येथे कर्मचारी अधिकाऱ्यांना रक्षाबंधन

PCMC : निगडी पोलीस स्टेशन येथे कर्मचारी अधिकाऱ्यांना रक्षाबंधन

पोलिस मित्र संघटनेचा उपक्रम (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष बाबुराव फडतरे यांचे अध्यक्षतेखाली निगडी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा सण पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा करण्यात आला, यावेळेस आम आदमी पार्टीच्या नेत्या श्रीमती सरोज कदम, पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष किरण पाचपांडे, पोलीस मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील राणे हेही उपस्थित होते. (PCMC)

यावेळी पोलीस वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी व माननीय पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी हा कार्यक्रम घेण्यास महिलांना पूर्णपणे सहकार्य केले व महिलांना त्यांना ही राख्या बांधल्या.


त्यांनी महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले, या कार्यक्रमांमध्ये इतर महिला पोलीस मित्रांनी ही सहभाग घेतला उज्वला चौधरी श्रीमती हिरवे, कविता बॅनर्जी सौ वर्षा वासनिक, आरती बावणे, सीमा बावनकर, ज्योती पुसदकर, श्रीमती कुसुम जावळकर, पुष्पा चव्हाण, रंजना सोनवणे, उज्वला तोमर यांनी पोलीस मित्र भगिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधण्यासाठी सहभाग घेतला.

सुधाकर पवार सुरेश बावनकर व श्री गरगटे यांनीही रक्षाबंधनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले

संबंधित लेख

लोकप्रिय