Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना मोठा धक्का बसला आहे. 50 किलोग्राम वजनगटातील अंतिम सामन्याच्या अगोदर त्यांना अधिक वजनामुळे डिस्क्वालिफाय करण्यात आले आहे. या घटनेनंतर विनेश फोगाट यांची तब्येत खालावली असून त्यांना तात्काळ पॅरिसच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांची तब्येत खालावली आहे. विनेश फोगाट डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध होऊन पडल्या, ज्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या ऑलिम्पिक गावातील पॉलीक्लिनिकमध्ये आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Vinesh Phogat
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांनी देखील याबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, “हा आपल्या देशासाठी अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे की, इतकी चांगली कुस्ती लढल्यानंतर आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतरही, 100 ग्रॅम अधिक वजन असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. भारत सरकारने विनेश फोगाट यांना प्रशिक्षक, पोषणतज्ज्ञ आणि फिजिओ पुरविले होते, आणि ते सर्व त्यांच्या सोबत होते. दोन दिवसांपर्यंत त्यांचे वजन स्थिर होते, परंतु रात्रीच हे वजन वाढले. याचे कारण त्यांच्या पोषणतज्ज्ञ आणि प्रशिक्षकांनीच सांगावे लागेल. डब्ल्यूएफआय कायदेशीर प्रक्रिया पाहत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद