मुंबई : भारतीय क्रिकेटसाठी एक अभिमानास्पद घटना घडली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) अनावरण करणार असल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “बीसीसीआयची नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि लवकरच बेंगळुरूमध्ये ती खुली होईल याचा आनंद आहे.” या नव्या NCA मध्ये ३ जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान, 45 सराव खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्या, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव, तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण, रिकवरी, आणि क्रीडा विज्ञान सुविधा उपलब्ध असतील. पावसाच्या काळातही खेळाडू येथे सराव करू शकतील.
BCCI
बीसीसीआयने (BCCI) फेब्रुवारी 2022 मध्ये बेंगळुरू विमानतळाजवळ नवीन NCA बांधण्याची योजना आखली होती आणि आज दोन वर्षांनी ती योजना साकार होताना दिसत आहे. ही अकादमी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी सर्वोत्तम वातावरण देणार असल्याचे जय शाह यांनी व्यक्त केले आहे.
सध्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी देखील बेंगळुरूमध्ये असून ती 2000 साली बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंह डुंगरपूर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली होती.
हेही वाचा :
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल
बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती
पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?
Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार
ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर