Varanasi : वाराणसी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतला. तसेच वाराणसी मधून त्यांनी रोड शो देखील केला मात्र या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जात असताना त्यांच्या बुलेटप्रूफ कारवर चप्पल फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. पीएम मोदींचा ताफा गजबजलेल्या भागातून जात असून लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, चप्पल फेकतानाचे दृष्य व्हिडिओमध्ये दिसत नाही. मात्र कारवरून चप्पल काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या कृत्याला जबाबदार असलेल्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान मोदींचा ताफा गर्दीच्या भागातून जात आहे आणि लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी वाहनाच्या बोनेटवर पडलेली चप्पल मागे फेकली. याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती
वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !