Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : NEET नंतर आता UGC NET परिक्षेत घोटाळा, एक दिवसापुर्वी...

मोठी बातमी : NEET नंतर आता UGC NET परिक्षेत घोटाळा, एक दिवसापुर्वी झालेली नेट परीक्षा रद्द 

UGC NET : यूजीसी नेट परिक्षे संदर्भात एक महत्वाची बातमी येत आहे. यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की 18 जून 2024 रोजी झालेल्या नेट परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (14C) ने दिलेल्या इनपुटनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET प्रमाणे, UGC NET परीक्षा देखील नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते.

NEET परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावर आधीच अडचणीत असलेल्या NTA साठी हा मोठा धक्का आहे. शिक्षण मंत्रालयाने बुधवारी, 19 जून रोजी ट्विट केले की, ‘गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे, 18 जून रोजी झालेली UGC NET 2024 परीक्षा रद्द करण्यात येत आहे. आता पुन्हा ही परीक्षा घेतली जाणार आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखेशी संबंधित माहिती ugcnet.nta.nic.in वर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘यूजीसी नेट परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नेट परीक्षेत हेराफेरीसाठी जबाबदार व्यक्ती किंवा संस्था आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

UGC NET

देशभरातील विद्यापीठांमध्ये पीएचडी प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी UGC NET परीक्षा घेतली जाते. मंगळवारी 317 शहरांतील 1205 केंद्रांवर ही परीक्षा झाली. एकूण 9 लाख 9 हजार 508 विद्यार्थ्यांनी नेटची परीक्षा दिली होती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय