पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : हिंदुकुल राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८४ जन्मोत्सव समारोप निमित्त ग.दि.माडगुळकर नाट्यगृहात राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, उदयोग, पत्रकारिता क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त सर्वधर्मीय नररत्नंना महाराणा प्रताप यांच्या नावाने पिंपरी चिंचवड (pcmc) शहरात प्रथमच कार्यक्रमाचे उदघाटक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. pcmc
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करत कुमारी तन्वी चौहान हिच्या सुमधुर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पाचोरा येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.सचिन देवरे यांनी आपल्या व्याख्यानातून महाराणा प्रताप यांच्या जीवनातील प्रमुख घटनांसह जीवनपट रोमहर्षक सांगितला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपसिंह हजारी, सहायक आयुक्त सिताराम बहुरे, माजी नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, ॲड. प्रताप परदेशी, राजन परदेशी, प.पू. अनिलराजदादा मराठे (महामंत्री अ. भा महानूभाव समाज), अवधेश कुमार सिंह, राम अवतार सिंह, नारायणसिंह सोनार, विजयसिंह, राजपूत, कैलाससिंह चौहान, हभप जालिंदर लोखंडे, शिवानंद चौगुले, विशाल परदेशी, अश्विनी राजपूत, प्रेमसिंह राठौड,महेंद्र परिहार,सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये राजपूत समाजाचे शहराध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांनी केले. संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३५ वर्षात समाजहित व देशहितासाठी केलेल्या अनेक चांगल्या कामांची माहिती दिली. तसेच येणा-या काळात देखिल राजपूत समाज संघटना समाजहिताची कामे करणार असल्याचे मत मांडले.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की महान पराक्रमी, स्वाभिमानी बाणा असलेले महाराणा दुश्मनांना कधीही शरण गेले नाही वेळप्रसंगी अरावली पर्वताच्या घनदाट जंगलात गवताच्या भाकरीचे सेवन व जमिनीवर झोपून तेथील आदिवासी भिल्ल, गोंड, कोरकू, ठाकर अशा जमातीच्या लोकांशी मैत्रीतून सशस्त्र फौज उभारणी केली व त्याचा उपयोग शेवटपर्यंत देश धर्म आणि मातृभुमिच्या रक्षणासाठी केला.अशा महान हिंदु राजे महाराणा प्रतापांच्या विचारांवर चालणारी राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर संघटनेने सर्वधर्मिय नररत्नांचा केलेल्या भव्यदिव्य राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन हे इतरांना प्रेरणादायी आहे. असे गाैरवोदगार करुन शाबासकी देत संघटनेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. pcmc news
अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी यांनी सांगितले की मी राजपूत समाजाचे आता पर्यंत हजारो कार्यक्रम पाहिले परंतु सर्वधर्मिय नररत्नांचा असा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जो अभुतपुर्व अकल्पनीय दैदिप्यमान आजतागायत नाही पाहीला त्याचप्रमाणे राजपुत संघटनेचे देखील सामाजिक शैक्षणिक धार्मिक तसेच गोरगरिबांची सेवा हि कामे काैतुकास्पद आहेत.
राजपुत समाज संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन करून राज्य तसेच देश पातळीवर हिंदुत्व जपत सर्वधर्म समभाव या महाराणा प्रतापांच्या विचारावर चालत वेगळा ठसा उमटविला आहे. pcmc
राज्यस्तरीय गुण गौरव सन्मान सोहळ्यात पि चि शहराचे दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे, जयसिंह राजपूत, प्रतापसिंह परदेशी, सैय्यद अहफाजोद्दीन यांना मरणोत्तर समाजभूषण तर धोंडूसाहेब मोरे, हभप एकनाथ महाराज नरवडे आध्यात्मिक वारकरी भूषण, पौर्णिमा परदेशी, विशाल धनवडे, वनश्री अरूण पवार, अतुल परदेशी, शिशुपालसिंह तोमर, देवानंद गहिले, हेमंत चौधरी, प्रिया परदेशी, छाया बैस, मेजर ईश्वर इंगळे, शैलेंद्र राजपूत, शामसिंह राजपूत, डॉ. सुरज चौहान, जिवनसिंह राजपूत, ॲड अंबिका परदेशी, वैशाली जाधव, विजय वसवे, संदिप शिंदे, राजू भुजबळ यांना समाजभूषण पुरस्काराने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच दहावी बारावी बोर्ड परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. pcmc
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी ॲड श्रीराम परदेशी, राणा अशोक इंगळे, राणा मुकेश राजपूत, गणेशसिंह राजपूत, दिनेश पाटील, रूपेश राजपूत, सागरसिंह बघेल, आषुतोश चंदेल, रविंद्र कच्छवे, मल्हार बायस, चतुर्भुज चव्हाण, रेश्मा चिलवंत, ज्योती परिहार, अच्युत चंदेल, रामेश्वर इंगळे, शुभम इंगळे, कुलदीप दिक्षित, आकाश ठाकूर, गणेश राजपूत सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी मेहनत घेतली. pcmc
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन चिलवंत आणि सुरेश तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन देहू नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पौर्णिमा विशाल परदेशी यांनी केले.
सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती राजपुत समाज संघटनेचे अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी दिली.
हेही वाचा :
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती
वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा