Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याShirur : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव...

Shirur : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव

Shirur : शिरूर लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाचे) उमेदवार आढळराव पाटील यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. आढळराव पाटील यांना हा मोठा धक्का बसला आहे. (Shirur)

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राजकिय वर्तुळात निर्माण झाले आहे. या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या विरुद्ध लढताना दिसले. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कडून तिकिट देण्यात आले होते. तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहात. आढळराव पाटील यांच्याविरोधात शिरूर लोकसभेच्या मैदानात होते.

शिरूर (Shirur) लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांनी तब्बल 98 हजार 807 मतांनी विजय मिळवला आहे, तर अमोल कोल्हे यांनी एकुण 5 लाख 00740 मते मिळवली. आढळराव पाटील यांनी 4 लाख 01 हजार 933 मते मिळाली मात्र ते पराभव झाले. आढळराव पाटील यांच्या पराभवामुळे आढळराव पाटील यांच्यासह अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव

ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

संबंधित लेख

लोकप्रिय