Baramati Loksabha Result : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांना राज्यात मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला महायुतीकडून चार जागा मिळाल्या होत्या त्यापैकी केवळ रायगड या एका जागेवर सुनिल तटकरे हे आघाडीवर आहेत. इतर सर्वच जागांवर अजित पवार यांना धक्का बसला आहे. (Baramati)
देशाचे लक्ष लागुन असलेला बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात होत्या. हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बारामती (Baramati) लोकसभा मतदार संघात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. तर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.
दरम्यान, 3 वाजून 25 मिनिटांच्या आकडेवारीनुसार, सुप्रिया सुळे यांना एकुण 2 लाख 03 हजार 741 मिळाले असून सुळे या 20 हजार 744 मतांनी आगाडी होत्या. तर, सुनेत्रा पवार यांना 1 लाख 82 हजार 997 मते मिळाली आहे. त्यांचा पराभव झाला आहे.
Baramati
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राजकिय वर्तुळात निर्माण झाले आहे. या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या विरुद्ध लढताना दिसत आहेत. यालाच एक भाग म्हणून अजित पवार गटातून बारामतीतून सुनेत्रा पवार उभे आहेत तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उभ्या आहेत. या दोन्हींमध्ये बारामतीत नेमका विजय कोण मिळवले याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण
मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !