अनेकांचा शिक्षक समितीत जाहीर प्रवेश
जुन्नर : जुन्नर तालुका शिक्षक समितीचा स्नेहमेळावा दिनांक ८ एप्रिल २०२२ रोजी जुन्नर येथे हॉटेल संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष साहेबराव अहिरे होते. ‘त्याग आणि सेवा’, ‘न्यायाची चाड! अन्यायाची चीड !’ हे ब्रीद घेऊन समित काम करत आहे.
यावेळी शिक्षक समितीच्या कार्याची दखल घेऊन संदीप तळपे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिक्षक समिती मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब लांघी म्हणाले, पतसंस्था ही आपली जीवनदायिनी असून अनेक प्रपंच पतसंस्थेमुळे उभे राहिले आहेत. परंतु सध्या चुकीच्या पद्धतीने कारभार चालू असल्यामुळे सभासद या मुजोरीला कंटाळले आहेत समविचारी घटकांबरोबर युती करून येणाऱ्या पतसंस्था निवडणुकीत शिक्षक समिती विजयी झेंडा फडकावेल. तसेच येणाऱ्या काळात शिक्षक समितीत अनेक शिक्षक जाहीर प्रवेश करणारे असल्याचे ते म्हणाले.
जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे तालुका अधिवेशन संपन्न
पुणे : जुन्नर तालुका अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न
तसेच यावेळी तुषार डुंबरे, संदीप तळपे, कैलास मुठे, नामदेव मुंढे, दत्ता भोईर, मारुती साबळे, नारायण मराडे, लक्ष्मण जाधव यांनी पतसंस्थेत चाललेल्या अनागोंदी कारभारावर टिका केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरचिटणीस राजेश दुरगुडे म्हणाले, “जुन्नर तालुका शिक्षक समितीचा स्थापनेपासूनचा इतिहास कथन केला. तसेच ते म्हणाले, “अगदी आठ ते दहा लोकांमध्ये स्थापना झालेल्या शिक्षक समितीचा तालुक्यात वटवृक्ष झालेला आहे. येणाऱ्या पतसंस्था निवडणुकीत शिक्षक पतसंस्था समितीच्या ताब्यात येईल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास साबळे आणि विठ्ठल जोशी यांनी केले, तर आभार जयश्री गारे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
जुन्नर : वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण