Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

RRR ठरला 1000 कोटीचा तिसरा मानकरी ,याआधी दोन चित्रपट कोणते ते जाणून घ्या !

---Advertisement---

 पुणे: ‘RRR’ या चित्रपटाने आपल्या रिलीजच्या सलग तिसऱ्या शनिवारी म्हणजे 16 व्या दिवशी जगभरात एक नवा विक्रम तयार केला आहे…

---Advertisement---

चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये (collection) शनिवारी 80 टक्क्यांनी वाढ झाली आणि यासह जगभरात बॉक्स ऑफिसवर (box office) एकूण 1000 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणारा भारतीय चित्रपटातील तिसरा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटाचा हिंदी कलेक्शन 250 कोटींच्या जवळ पोहचला आहे, तर अमेरिकन बॉक्स ऑफिसवर (American box office) चित्रपटाने 100 कोटीचा गल्ला जमवला आहे. गेल्या हफ्त्यात चित्रपटाचा कमाईचा आकडा कमी झाला होता पण चित्रपटाने रिलीजच्या 16 व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शनिवारी सुमारे 17 कोटी रुपयांची कमाई केली. मागील दिवसाच्या तुलनेत 80 टक्के अधिक कमाई केली. चित्रपटाचे कलेक्शन एका दिवसात इतके वाढेल अशी त्याच्या निर्मात्यांनाही अपेक्षा नव्हती. पण या चित्रपटाने वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये (Worldwide Collection) एकूण 1000 कोटींची कमाई केली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

‘बाहुबली 2’ आणि ‘दंगल’ नंतर ‘RRR’ या चित्रपटाने एकूण 1000 कोटींची कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘RRR’ कोरोना महामारीनंतर एकुण हजार कोटींचा गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट आहे आणि हा आकडा गाठण्यासाठी या चित्रपटाला फक्त 16 दिवस लागले आहेत. राजामौली (Rajamouli) दिग्दर्शित या चित्रपटात तेलुगू चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अजय देवगण आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत.

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles