Jail Guard Recruitment : राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार असताना अवघ्या १८०० जागांसाठी तब्बल पावणेचार लाख अर्ज आले आहेत. Police Bharti
पोलीस दलातील अन्य पदांसाठीही लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. (Jail Guard Recruitment)
राज्यभरात १८०० रिक्त जागांसाठी ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिली. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याखेरीज गृहमंत्रालयाने राज्य पोलीस दलातील शिपाई, चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची रिक्त पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे. या १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार अर्ज आले आहेत. यात पोलीस शिपायांच्या ९ हजार ५९५ रिक्त पदांसाठी सर्वाधिक ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले. वाहनचालकाच्या १,६८६ जागांसाठी १ लाख ९८ हजार ३०० युवक-युवतींनी अर्ज केले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त दै.लोकसत्ता ने दिले आहे.
हे ही वाचा :
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी