मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद सुरूअसल्याची चर्चा आहे. अशात शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा होत आहे, मात्र आता पर्यत मंत्रीमंडळाचा झालेला नाही, असे असतानाच आता शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.
यामध्ये शिंदे गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संजय राठोड या मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त देखील अनेक माध्यमांनी प्रसारीत केले होते.
बातमीत तथ्य नाही – देसाई
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर शंभुराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पाच मंत्र्यांना डच्चू देणार याबाबत कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. जर या बातम्या खोट्या ठरल्या तर निश्चितपणाने तुम्ही आमच्या मंत्री महोदयांची माफी मागणार का?, असा सवाल शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा :
गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार
बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा
आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस
ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज
ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी
बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन