Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनापुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5899

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5899

पुणे (प्रतिनिधी) (25 मे):-

     देशभरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक 50231 आहे. पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5899 झाली आहे. त्यामध्ये 2998 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 2623 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत. विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7218 झाली आहे. विभागातील 3442 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 3435 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रूग्ण संख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 395 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 283, सातारा जिल्हयात 31, सोलापूर जिल्हयात 20, सांगली जिल्हयात 6 तर कोल्हापूर जिल्हयात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

दि. 25 मे दुपारी 3 वाजेपर्यंत

    आजपर्यत विभागामध्ये एकुण 72855 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 64607 चा अहवाल प्राप्त आहे. 8288 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 57280 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7218 चा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय