Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडयुध्दग्रस्त सुदान मधून 360 भारतीयांना हवाईदलाच्या विमानाने दिल्लीत आणले

युध्दग्रस्त सुदान मधून 360 भारतीयांना हवाईदलाच्या विमानाने दिल्लीत आणले

नवी दिल्ली:दि.27-युद्धग्रस्त सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या 246 भारतीयांसह भारतीय हवाई दलाचे विमान मुंबईत दाखल झाले.
सौदी अरेबियाची राजधानी जेद्दाहून सकाळी 11 वाजता उड्डाण घेतलेले विमान दुपारी 3.15 वाजता येथे उतरले,असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

360 भारतीयांची पहिली तुकडी 26 एप्रिल रोजी नवी दिल्लीत दाखल झाली.
‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत, भारत आपल्या नागरिकांना खार्तूम आणि इतर संकटग्रस्त भागातून बसेसमधून पोर्ट सुदानला घेऊन येत आहे, तेथून त्यांना भारतीय हवाई दलाच्या C-17 वाहतूक विमानातून सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे नेले जात आहे. खार्तूम आणि पोर्ट सुदानमधील अंतर सुमारे 850 किमी आहे.



तत्पूर्वी, अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी भारतीय नौदलातील INS तरकश बंदर सुदानला पोहोचले, असे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या “ऑपरेशन कावेरी” बाबतच्या ताज्या घडामोडींची माहिती देताना श्री क्वात्रा म्हणाले की, सौदी अरेबियाने आतापर्यंत आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दिलेल्या सहकार्यानबद्दल भारत “अत्यंत कृतज्ञ” आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय