Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणजिल्ह्यातील ३ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु. वाचा सविस्तर

जिल्ह्यातील ३ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु. वाचा सविस्तर

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग व २ प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-१९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील चिखली बाजारभोगाव राज्य मार्ग क्र. १९३ मार्गावरील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर १ फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पोहाळे-पोहळेवाडी मार्गाने व मलकापूर वळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

आजरा तालुक्यातील नवले देवकांडगाव, साळगाव प्रजिमा ५८ वरील साळगाव बंधाऱ्यावर ३ फुट पाणी आल्याने वाहतूक बंद असून सोहाळे मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय