(मुंबई):- कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील जवळ पास सर्वच क्षेत्रे कोलमडून पडले आहे, काही देशांतील परिस्थिती पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे अनेक भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले होते.
याच पार्श्वभूमीवर वंदेभारत अभियानांतर्गत १८२ विमानातून २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ३४७, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ९ हजार ७५२ तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ८ हजार ३३६ इतकी आहे. १५ जुलैपर्यंत आणखी ४० विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत, अशी माहिती आज मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
वंदेभारत अभियानांतर्गत १८२ विमानातून २८४३५ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १०३४७,उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ९७५२ तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ८३३६ इतकी आहे. १५जुलैपर्यंत आणखी ४०विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2020
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतुक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबई येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते व सदरील प्रवाशांचा वाहतुक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.
हे वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडले जात आहे.