Monday, May 20, 2024
Homeराज्यकोल्हापूरात मुसळधार पाऊस; २७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूरात मुसळधार पाऊस; २७ बंधारे पाण्याखाली

(प्रतिनिधी) :- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राधानगरी धरणातून १०५८ क्युसेक तर कोयनेतून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

            जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६७.०३ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजेच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ असा एकूण १९०८ क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

         पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली. वारणा नदीवरील माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय