जुन्नर : राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला नाही मात्र निर्बंध लावण्यात आले आहे. आज जुन्नर तालुक्यात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
तर तालुक्यात २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये वारूळवाडी ८, नारायणगाव ६, आळे २, वडगाव कांदळी १, उंब्रज नं. २, शिरोली बु.१, पिंपळवंडी १, कुसुर १, खामगाव १, हिवरे तर्फे ना. गाव १, वडगाव आनंद १, माणकेश्वर १, संतवाडी १, येणेरे १ समावेश आहे.
तर मागील २४ तासात ३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नारायणगाव येथील एक ७० वर्षीय पुरुष व एक ४८ वर्षीय स्त्री, शिरोली बु. ७४ वर्षीय पुरुष असा समावेश आहे.
तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ५२२ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ४८ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५९ असून सध्या तालुक्यात २१५ ऍक्टिव कोरोना रुग्ण आहेत.