Friday, December 6, 2024
Homeग्रामीणपिंपरी चिंचवड : भारत नरवडे यांची पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या संचालकपदी निवड

पिंपरी चिंचवड : भारत नरवडे यांची पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या संचालकपदी निवड

 

चिखली : चिखली येथील युवाउद्योजक भारत नरवडे यांची पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे पुरवठादार असलेल्या सुमारे 2000 हजाराहून जास्त सभासदांची ही संघटना गेली 35 वर्षे या शहरात काम करत आहे.

लघु उद्योजकांना अखंडित आणि माफक दरात वीजपुरवठा करावा, मनपाच्या मिळकत कर, शास्ती कर आणि पाणीपट्टीमध्ये सूट मिळावी, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 8 टक्के दराने कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी लघुउद्योजक संघटनेची आहे, असेही भारत नरवडे यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय