Sunday, May 19, 2024
Homeराजकारणकेंद्र सरकारच्या निलाजरेपणात महाराष्ट्राने सामील होऊ नये - CPI

केंद्र सरकारच्या निलाजरेपणात महाराष्ट्राने सामील होऊ नये – CPI

मुंबई : केंद्र सरकारच्या निलाजरेपणात महाराष्ट्राने सामील होऊ नये, असे पत्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी प्रकाश रेड्डी, व मिलिंद रानडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लिहिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोना महामारी सारखा गंभीर प्रश्न अत्यंत संवेदनशील पणे हातळला आहे.  कोरोना वॅक्सिन घेतलेल्या लोकांना जे सर्टिफिकेट देण्यात येते त्यावर पंतप्रधान मोदींचा हसरा चेहरा असलेला फोटो आहे. कोरोना सारख्या आजाराने जगभरात थैमान घालुन लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. स्वत:च्याच प्रेमात पडलेल्या मोदींना संडास, रेशन दुकान, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ, असा सगळीकडे स्वतःचा फोटो लावण्याची हौस आहे. कोरोना ही हौसेची बाब नाही. याचे भान पंतप्रधानांना उरलेले नाही.

कोरोनाच्या प्रंसगी असा फोटो लस घेतल्याबद्दल लावणे हे कोरोना ने मृत्युपावलेल्यांचा अवमान आहे  आणि जे लस घेणार आहेत त्यांना जणू काही मोदी उपकृत करत आहेत असे वाटावे ही केंद्र सरकारची भूमिका आहे. 

आपण महाराष्ट्रात अशा निर्लज्जपणाला त्वरित रोखावे, आणि महाराष्ट्रात हा फोटो काढून लोकांना सर्टिफिकेट द्यावे. तुम्ही लोकांच्या भावनांचा आदर करावे, असेही म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय