जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार 139 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार नारायणगाव १५, डिंगोरे २१, ओतूर १२, पिंपळवंडी १०, मांजरवाडी ४, चिंचोली ४, निरगुडे ३, आळे ३, गुळूचवाडी ३, बोतार्डे ३, वारुळवाडी ३, ओझर ३, खोडद ३, वडज २, पारुंडे २, गोळेगाव २, शिरोली बु. २, खामुंडी २, आर्वी २, तळेरान २, पिंपळगाव जोगा २, निमगिरी २, केवाडी २, पिंपरी पेंढार २, आळे २, सुकाळवेडे २, शिंदे १, खिरेश्वर १, सांगनोरे १, वाटखाळे १, येडगाव १, धनगरवाडी १, आंबेगव्हाण १, चाळकवाडी १, कांदळी १, बोरी बु.१, कुमशेत १, गुंजाळवाडी आर्वी १, निमदरी १, हडसर १, बेल्हे १, पिंपळगाव आर्वी १, जुन्नर नगरपरिषद ११ यांचा समावेश आहे.
तर तालुक्यातील ४ पुरुष व ३ स्रियांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे.