मुंबई, दि. ७ : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यातील कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेस 12 कोटी मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थांसाठी अर्थसहाय्य योजनेतून जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष अनुदान म्हणून राज्य सरकारने 4 कोटी रूपये, शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विभागाने 8 कोटी रूपये असे, तब्बल 12 कोटी रूपये या कारखान्यासाठी मिळाले आहे.
कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून हिरडा या वनोत्पादनावर प्रक्रिया करून औषध तयार करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग करून जुन्नर (Junnar) तालुक्याच्या विकासास हातभार लावण्यासह आदिवासी बांधवांना उद्योजकतेकडे घेऊन जाणाऱ्या, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणाऱ्या सहकारी संस्थेस प्रोत्साहन देणे आवश्यक होते.
आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. हा अर्थसहाय्यास निधी मंजुर केल्याबद्दल आमदार अतुल बेनके त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
Junnar
हेही वाचा :
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद