Friday, April 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर : मांडवी किनारा पतसंस्थाची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत संपन्न

जुन्नर : मांडवी किनारा पतसंस्थाची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत संपन्न

11 टक्के लाभांशासह दिवाळी भेट देणार !

जुन्नर : ओतूर येथील मांडवी किनारा नागरी पतसंस्थाची 22 वी वार्षिक सर्व साधारण सभा आज मंगळवार, दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष संभाजी तांबे होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर सभेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा ! जुन्नर : दिव्यांग विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न !

यावेळी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना, संस्थेचे अध्यक्ष,  संचालक मंडळ व संस्थेचे कार्यकारी संचालक संदीप बोचरे यांनी समर्पक उत्तरे दिली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे यांनी सांगितले की, संस्थेच्या ओतूर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा व बेल्हे या ठिकाणी पाच शाखा असून यावर्षी संस्थेला सुमारे 44 लाख 91 हजार रुपये नफा झालेला आहे.

तसेच 11 टक्के लाभांशासह दिवाळी भेट देणार असल्याचे सांगितले आहे. सभासदांनी सदर बाबतीस मंजुरी देऊन संचालक मंडळाचे कौतुक केले आहे. 

तसेच यानंतर ओतूर येथील मोनिका महिला नागरी पतसंस्थेची 5 वी सर्व साधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निलिमा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे.

हेही वाचा ! ई – पिक पाहणी : आदिवासी भागात रेंजसह सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा अभाव, तहसीलदारांकडे मागणी

मोनिका पतसंस्थेच्या वतीने सुध्दा यावर्षी दिवाळी भेट देणार असल्याचे संस्थेच्या सचिव मोनिका शहा यांनी यावेळी सांगितले. ओतूर मधील या दोन्ही पतसंस्थेच्या सभा ऑनलाईन पध्दतीने आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. दोन्ही संस्थांच्या कामकाजावर सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय