Friday, March 29, 2024
Homeजिल्हापुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

पुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

हडपसर / डॉ. अतुल चौरे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला जात  आहे. कोरोनाच्या काळात आज तरुणाई बंदिस्त झाली आहे. 21 व्या शतकातील तरुणाई ही माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आरूढ झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही स्वतःबरोबर राष्ट्रावर प्रेम करायला शिकवते. 21 व्या शतकातील तरुणाई हीच राष्ट्राची पॉवर आहे. राष्ट्र उभारणीचे काम राष्ट्रीय सेवा योजनेत  केले जाते. आपण सर्वजण राष्ट्रहितासाठी काम करूया. श्रमाने माणूस मोठा होतो. भारत देश महासत्ता होण्यासाठी प्रत्येक युवकाने श्रम केले पाहिजेत. युवकांनी उत्तम आहार घेतल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहील. कारण आरोग्य हीच संपत्ती आहे. व्यसनापासून युवकांनी दूर राहायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक ही आपल्या देशाची फार मोठी संपत्ती व संस्कृती आहे. आई-वडिलांवर प्रेम करा, असे विचार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक डॉ. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले. 

ब्रेकिंग : कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणीं चा कॉग्रेस प्रवेश : Live

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, भारताने सुपर पॉवर होण्यासाठी युवकांनी वेळेचे भान ठेवले पाहिजे. तरुणाईचे  मन, मेंदू, मनगट मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे. प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधणारी जपानची श्रमसंस्कृती युवकांनी स्वीकारली पाहिजे. आपला भारत देश बलशाली केला पाहिजे. असे विचार त्यांनी मांडले. 

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनकर मुरकुटे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. ऋषिकेश खोडदे यांनी केले. 

हेही वाचा ! केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?

या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय