Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडउद्यापासून ऑनलाइन मिळेल 10वी परीक्षेचं हॉल तिकीट, असं करा डाऊनलोड

उद्यापासून ऑनलाइन मिळेल 10वी परीक्षेचं हॉल तिकीट, असं करा डाऊनलोड

दहावी बोर्डाच्या परीक्षेला (Board Exam 2024) बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट (10th Exam Hall Ticket) बुधवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार आहे.विद्यार्थी 31 जानेवारीपासून आपलं हॉल तिकीट ऑनलाइन मिळवू शकणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपासून हॉल तिकीट मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत हे हॉल तिकीट मिळणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे. राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या वर्षी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी हा वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून या निर्णयाबाबतची माहिती दिली आहे. यामुळे दोन तासांचा पेपर 2.10 तासांचा होईल आणि 3 तासांच्या पेपरसाठी 3.10 मिनिटांचा वेळ दिला जाईल.

संबंधित लेख

लोकप्रिय