अफगाणिस्तानला नमवून इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपमधील सेमीफायनलचा दुसरा सामना (2nd Semi Final) होईल.
गयाना: अंडर 19 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील (U19 World Cup 2022) सेमीफायनलचा पहिला सामना झाला आहे. अफगाणिस्तानला नमवून इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपमधील सेमीफायनलचा दुसरा सामना (2nd Semi Final) होईल. पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्डकपचे (India U19) जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरेल. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करतोय. पण सेमीफायनल म्हटलं की, थोडा दबाव हा असतोच. भारतासमोरच आव्हान सोप नाहीय.
क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आतापर्यंत अजिंक्य असलेल्या भारताच्या युवा संघासाठी ऑस्ट्रेलियाला नमवणं अशक्य नाहीय. कारण त्यांनी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करुन अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसऱ्याबाजूला ऑस्ट्रेलियन संघ सराव सामन्यातील पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील विजेता अंतिम फेरीत इंग्लंडला भिडणार आहे. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आकडे आणि परफॉर्मन्स दोन्ही अंडर 19 युवा संघाच्या बाजूने आहे.
कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची का असतात?
आकड्यांमध्ये भारत पुढे
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीम्समध्ये आतापर्यंत 36 वनडे सामने झाले आहेत. यात 22 वेळा भारत तर 14 वेळा ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला आहे. आज वेस्ट इंडिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात सेमाफायनलचा सामना होईल. तटस्थ देशांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी आहे, त्यावर नजर टाकूया. न्यूट्रल म्हणजे तिसऱ्या देशात दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत पाच वनडे खेळल्या गेल्या आहेत. त्यात चार वेळा भारत विजेता ठरला आहे. फक्त एकदाच ऑस्ट्रेलियाला सामना जिंकता आला आहे.