Thursday, December 5, 2024
Homeराज्यPCMC : पुणे ते नागपूर संघर्ष यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे – आमदार...

PCMC : पुणे ते नागपूर संघर्ष यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे – आमदार रोहित पवार 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राज्यात एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्केपेक्षा जास्त युवावर्ग आहे. या तरुणांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले असून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

मंगळवारी (दि.१७) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी महापौर व जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत -धर, शकुंतला भाट, जनाबाई जाधव, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश पदाधिकारी रविकांत वर्पे, काशिनाथ नखाते, शहर प्रवक्ते माधव पाटील, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, जयंत शिंदे, राहुल आहेर, सागर तापकीर, प्रशांत सपकाळ, मयूर जाधव, राहुल पवार,स्वप्नाली असोले आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, 24 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महात्मा फुले स्मारक समताभुमी येथे अभिवादन करून वीर लहुजी वस्ताद साळवे तालीम ते टिळक स्मारक मंदिर या परिसरातून युवा संघर्ष यात्रेस प्रारंभ करण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबरला तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापासून फुलगाव, वढु खुर्द, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा मार्गे सनसवाडी भैरवनाथ मंदिर येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. 

यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, बीड जिल्ह्यातील पाटोदा, जवळा, पिंपळनेर, गेवराई, जातेगाव, घनसांगवी, जालना जिल्ह्यातील मुद्रेगाव फाटा, कुंभार पिंपळगाव, परतुर, परतुर, मंठा, नांदशी फाटा मार्गे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर चारठाणा, मालेगाव फाटा, माणकेश्वर, मार्गे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, नागेश्वर महादेव मंदिर हत्ता, सेनेगाव, रिसोड, ताकतोडा, सेनगाव, वलाना, वनोजा फाटा, तसेच वाशिम जिल्ह्यातील मोहजा, वाशिम शहर, कळंबा महाली, बितोडा भोयर, मंगळूर पीर, दस्तापुर शिवनी, कारंजा, धानोरा, ताथोडा, वाढोना मार्गे अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर, सुलतानपूर, घुईखेड, चांदुर रेल्वे, देवगाव, भातकुळी मार्गे वर्धा जिल्ह्यात 29 नोव्हेंबर रोजी धोत्रा येथे सभा संपून गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी सेवाग्राम येथे मुक्काम होईल.

शुक्रवारी एक डिसेंबर रोजी वर्धा तालुक्यातील पवनार, घोरडता सेलू नंतर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, पेंढारी, एरणगाव, उमरी फाटा, हिंगणा तालुक्यातील नागपूर हिंगणा तालुका येथील येरणगाव, उमरी फाटा, चिंचोली पठार, पांजरा, तालुका काटोल बाजारगाव, पाच डिसेंबर मंगळवारी बाजारगाव, कळमेश्वर चौक, लीलाधर वानखेडे, सहा डिसेंबर रोजी नागपूर लीलाधर वानखेडे सभागृह मार्गे नागपूर शहरात संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून गुरुवारी सात डिसेंबर रोजी रोजी नागपूर शहरात दिवसभर फेरी काढून संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. 

या संघर्ष यात्रेतील सर्व मुक्कामाच्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते नागपूर 800 किलोमीटरचे एकूण अंतर 45 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी ही माहिती आ. रोहित पवार यांनी यावेळी दिली.

या संघर्ष यात्रेमध्ये क्रीडा विभागाचं सक्षमीकरण, होतकरू खेळाडूंना संधी, बेरोजगार युवकांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी, नोकरदार महिला व विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे,महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा, TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद, सर्व भरती प्रकीया MPSC मार्फत करणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या Two Tier शहरांमध्ये IT क्षेत्राच्या विकासासाठी धोरण, सारथी, बार्टी, महाज्योती व TRTI संस्थाचे सक्षमीकरण, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी Reskilling, Up skilling विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह शासनाने उभारावे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारची कंत्राटी नोकरभरती, अवाजवी परीक्षा शुल्क, पेपरफुटी विरोधात कायदा, शाळा दत्तक योजना, नोकर भरतीतील भ्रष्टाचार, शिक्षकांची रिक्त पदे, समुह शाळा योजना, रखडलेल्या नियुक्त्या, नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखणे, रखडलेली भरती प्रक्रिया, युवा आयोगाची स्थापना, महिलांची सायबर सुरक्षा, तालुका स्तरावर MIDC ची स्थापना या विषयांवर युवकांशी संवाद साधला जाणार आहे.

पुण्यातून सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेत पिंपरी चिंचवड शहरातून पहिल्या टप्प्यात अडीच हजार युवक सहभागी होणार असून टप्प्याटप्प्याने पिंपरी चिंचवड शहरातील युवकांची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यावेळी दिली.

पुणे ते नागपूर संघर्ष यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे – आमदार रोहित पवार Youth should participate in Pune to Nagpur Sangharsh Yatra – MLA Rohit Pawar
पुणे ते नागपूर संघर्ष यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे – आमदार रोहित पवार Youth should participate in Pune to Nagpur Sangharsh Yatra – MLA Rohit Pawar
संबंधित लेख

लोकप्रिय