Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजुन्नर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली, मणिपूर घटनेचा केला निषेध

जुन्नर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली, मणिपूर घटनेचा केला निषेध

जुन्नर : जुन्नर येथे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मूक रॅलीला सुरुवात झाली. हातावर काळ्या फित बांधून मणिपूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ या मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


ही रॅली मुख्य बाजारपेठ मधून आदिवासी समाज प्रबोधिनी बारव या ठिकानी काढण्यात आली. याठिकाणी रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून इरसाळवाडी येथील दुर्घटनेत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरे सर यांनी केली. त्यानंतर काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी पंचायत समिती सदस्य काळू गागरे, आदिवासी प्रकल्प स्तरीय समिती सदस्य दत्ता गवारी, मोरे सर, घोटकर सर, भाऊ देव्हडे, आदिवासी नेते काळू शेळकंदे उपस्थित होते.


यावेळी माकप सचिव गणपत घोडे यांनी आदिवासी समाजाच्या समस्या आमदार अतुल बेनके यांच्या समोर मांडल्या. तसेच आदिवासी समाजाच्या प्रश्नासंदर्भातील निवेदन यांच्याकडे सुपुर्त कार्यात आले. दादाभाऊ बागड यांच्या अध्यक्षीय भाषनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय