Saturday, May 18, 2024
HomeNewsजागतिक चिमणी दिन (२० मार्च)-सामाजिक बांधिलकीतून पक्षाची घ्या काळजी --अण्णा जोगदंड

जागतिक चिमणी दिन (२० मार्च)-सामाजिक बांधिलकीतून पक्षाची घ्या काळजी –अण्णा जोगदंड

पक्षांसाठी केली दाणा पाण्याची व्यवस्था

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:
पहिला जागतिक चिमणी दिन २० मार्च २०१० पासून पाळला जातोय.सध्या वाढत्या शहरीकरणामुळे व वाढत्या प्रदूषणामुळे चिमण्यांचे तसेच ईतर पक्षाचे पण अस्तित्व नष्ट होत चालले आहे.आपल्याला लहानपणी संध्याकाळी अंगणातील झाडावर ५० ते ६० चिमण्यांची खोपे (घरटे) पाहावयास मिळावयाचे आणि चिऊताईची  चिवचिवाट ऐकायलाच मिळत असे.आता मात्र आपणास सर्वांना चिमण्या सह ईतर पक्षी दिसेनासे झाले आहेत .

ग. दि .माडगूळकरांच्या “हे चिमण्यांनो परत फिरा “हे गाणे मला आठवले आणि मी माझ्या घरांच्या समोरच चिऊताई साठी  प्लास्टिकच्या  अनेक टोपल्या दारासमोर व गच्चीत  टांगलेल्या आहेत.आणि काही प्लास्टिकच्या टोपलीत धान्य  व पाणी एक महिन्यापासून ठेवत आहे. सकाळी ,संध्याकाळी आवर्जून त्या ठिकाणी चिमण्या बरोबर कावळे ही पाण्यासाठी येतात .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड म्हणाले की पक्षी नष्ट होत चालले आहेत याला काही अंशी मोबाईल टावर ही कारणीभूत आहेत.सिमेंटच्या जंगलात विकासाच्या नावाखाली वृक्ष तोड शहरात होतेय अन्न व पाण्याची नितांत गरज पक्ष्यांना शहरी भागात जाणवत आहे. म्हणूनच सामाजिक बांधिलकी समजून आपल्याला काहीतरी समाजाचे काही तरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्य दृष्टिकोनातून मी माझ्या घराच्या समोरच आणि गच्चीत काही टोपलीमध्ये पाणी तर काही टोपलीत धान्य ठेवत आहे .संध्याकाळी उशिरा घरी गेलो पक्षांना पाणी पिताना आणि धान्य खाताना बघितल्याबरोबर लहानपणीच्या आठवणी येतात असे जोगदंड यांनी आवर्जून सांगितले .

पुढे जोगदंड म्हणाले की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीत कमी चार महिने तरी पक्षासाठी पाण्याची व धान्याची सोय करून पक्षाची जतन करण्यासाठी आपापल्या परीने मदत करावी.असे आव्हान केले आहे,त्यासाठी त्यांनी घरासमोर पक्षांसाठी दाणा-पाण्याची विशेष व्यवस्था केली आहे.

फोटोवळ:  सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांनी आपल्या घराच्या समोरच पक्षासाठी पाण्याची  व धान्य ची केलेली सोय.20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय