Sunday, May 5, 2024
HomeNewsमहिला दिनानिमित्त दारूबंदीचा ठराव संमत

महिला दिनानिमित्त दारूबंदीचा ठराव संमत

धाराशिव:धारूर येथे जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये प्रामुख्याने गावातील अवैध दारु विक्री केली जात होती.त्याला आळा बसावा, या उद्देशाने गावातील संपूर्ण महिला भगिनी यांनी दारूबंदीची मागणी केली.तसेच अवैध दारू विक्री बंदी करण्यासाठी ठराव संमत करण्यात आला.यावेळी उपस्थित गावातील गावकरी मंडळी तसेच माता भगिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ग्रामसभा यशस्वी केली.

यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार,ग्रामसेवक अहिरे,उपसरपंच पांडुरंग लोहार,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप माधव कदम,सुलाबाई धन्यकुमार पवार,अश्विनी बापूराव गायकवाड,वर्षा सोमनाथ स्वामी,वच्छला नामदेव जगताप,शुभांगी उमेश पवार,शुभांगी वैजनाथ शिंदे,तुकाराम त्रंबक गायकवाड,तसेच अभिजीत कामटे,महेश गडदे,बाळासाहेब कोरे,विशाल पवार,बालाजी गुरव श्रीराम कदम जयसिंग पाटील,महेश गुरव,बंडू शिंदे,रमेश कामटे,भैरवनाथ लोहार गावातील सर्व नागरिक गावकरी मंडळी सामाजिक कार्यकर्ते माता भगिनी ग्रामसभेला उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय