Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसंत गाडगेबाबांचा आदर्श कामगारांनी जपावा - काशिनाथ नखाते

संत गाडगेबाबांचा आदर्श कामगारांनी जपावा – काशिनाथ नखाते

पिंपरी : संत गाडगे महाराज यांनी स्वच्छते बाबत केलेले कार्य खूप मोठे असून ते चालते फिरते स्वच्छतेचे विद्यापीठ होते, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कामगाराने आपला परिसर व कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवावे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

वर्किंग पीपल चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी दिनेश राठोड, मंगला देशमुख, रोहित माने ,नाना कसबे, सलीम डांगे, वैशाली कदम, सुवर्ण पोतदार, अंजली सुतार, बायडा माने, गिरीश चव्हाण आदीसह कामगार बांधव उपस्थित होते.

संत गाडगे महाराज यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता शाकाहारी गोड जेवण दिले. हा त्या काळचा  मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व आज राज्याचे प्रेरणादायी बनले आहेत.

दिवसभर फिरूंन गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनात परिवर्तनाचे  किर्तन करायचं, त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा. किर्तनात ते संत कबीरांच्या दोहयांचा उपयोग करत जागरुकता निर्माण केली. महासंघातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान सुरू केले असून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी, कष्टकरी वर्गाने आपण काम करत असलेल्या कामाचा परिसर, कामाची जागा आणी  फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाची जागा अत्यंत स्वच्छ ठेवून त्यामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने स्वच्छता ठेवावी. संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे जनक आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करावे आवाहन काशिनाथ नखाते यांनी केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय