Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याwomen's day: महिला दिन विशेष, आपण सारेच पुरुष, आता स्त्री होऊ या…

women’s day: महिला दिन विशेष, आपण सारेच पुरुष, आता स्त्री होऊ या…

women’s day : आज महिला दिन. महिला दिनाला हे वाचून काहीसे आश्चर्य वाटेल पण हा मुद्दा नीट समजून घ्यावा. (women’s day) रजनीश म्हणतात “करुणा, प्रेम, अहिंसा, सेवा हे स्त्रीत्वाचे गुणविशेष आहेत. आणि हिंसा, कठोरता, हे सारे पुरुषी गुण आहेत. या दोन्ही प्रकारच्या गुणांचा स्त्री किंवा पुरुषांच्या शरीराचा काहीही संबंध नाही. हे गुण दोन्हीही प्रकारच्या व्यक्तीत असू शकतात. दोन्ही प्रकारचे गुण एकाच व्यक्तीत असू शकतात पण जे गुण जास्त प्रभावी असतील ती व्यक्ती त्या प्रकारची समजावी. म्हणजे एखाद्या स्त्रीत कठोरता असेल तर ती पुरुषप्रधान गुणांची आहे आणि एखादा पुरुष स्त्री गुण असलेला आहे तर त्या व्यक्तीला स्त्रीप्रधान गुणांची मानावी. Women’s Day Special

इतके थेट स्पष्ट केल्यावर रजनीश बुद्धाचे उदाहरण देतात ते म्हणतात की बुद्धाचा प्रवास हा पुरुष मूल्यांकडून स्त्री मूल्यांकडे झाला. राजा अशोकाचा प्रवास हा त्याच प्रकारचा आहे. त्यामुळे स्त्री मूल्ये ही मानवतावादी मूल्ये आहेत आणि तीच अध्यात्मिक मूल्ये आहेत.

आपल्यातील मनुष्यत्वाला ती उन्नत करणारी मूल्ये आहेत. ते उदाहरण देतात की राम, कृष्ण, महावीर, बुद्ध यांची चित्र पुरुष असूनही दाढी मिशा नसलेली काढली जातात किंबहुना स्त्रीप्रधान सुंदरतेने काढली जातात याचे कारण त्या व्यक्तीचा प्रवास या स्त्री प्रधानतेकडे झालेला आहे हे दाखविले जाते. म्हणून हिंसा करणारा योद्धा हा दाढी मिशा असलेला आणि संत हा स्त्री चेहऱ्यात दाखविण्यामागे ही मूल्यांची वाटणी आहे.

या प्रकाशात महाराष्ट्रात ‘ ज्ञानेश्वर माऊली’ हा शब्दप्रयोग कुणाला खटकत नाही आणि एका पुरुषाला माऊली का म्हटले जाते याचे उत्तर मिळते आणि ज्ञांनेश्वरांचे चित्र हे मिशा दाढी नसलेले व सुंदर का दाखविले जाते याचे उत्तर मिळेल. साने गुरुजींना महाराष्ट्राची माऊली म्हटले जाते ते यामुळेच. साने गुरुजी यांचे व्यक्तिमत्व रजनीश म्हणतात त्याप्रकारचे आहे व आंदोलनात ते पुरूष गुण ही व्यक्त करीत. अमृता प्रीतम आणि इमरोज नात्यात इमरोज ची जास्त चर्चा होते याचे कारण इमरोज याने ही स्त्री प्रधान गुण खूप उत्कटतेने आत्मसात केले आहेत आणि स्वामित्वभावना या पुरुषी गुणाच्या वर उठून स्त्रीप्रधान समर्पणाची आणि प्रेमाची चरमसीमा गाठून दाखवली आहेे, त्यामुळे आपण सारे कोमल होऊ या। स्त्री गुण आत्मसात करू या…!!!

– हेरंब कुलकर्णी
(लेखक, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

हे ही वाचा :

मोठी बातमी : घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय