Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवडच्या विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देणार - आप

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देणार – आप

आप तर्फे पिंपरी चिंचवड मधील इच्छुक उमेदवारांना आवाहन

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली असून महापालिकेच्या सर्व म्हणजे 139 जागा लढणार असून www.aappimprichinchwad.org/application-form-for-candidature/ या वेबसाईटच्या माध्यमातून शहरातील सर्व स्तरातील इच्छुक नागरिकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत.

देशाच्या राजकारणात आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण करणारा आम आदमी पक्ष आता फक्त दिल्ली, पंजाब अथवा उत्तर भारतापुरता मर्यादित न राहता सर्व देशात लोकप्रिय होत आहे, महाराष्ट्रात देखील पक्षाची संघटना वाढत असून महनगरांमध्ये पक्षाची बांधणी चांगली होत आहे. मागील काही वर्षांत लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवण्यावर पक्षाने भर देत शहरांतील अनेक प्रलंबित कामे सत्ताधाऱ्यांचा पाठपुरावा करत मार्गी लावली आहेत. याच भरीव कामगिरीच्या आधारावर सामान्य जनतेच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

आपचे शहर प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात आप तर्फे प्रचाराला सुरुवात झाली असून व पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शहरासाठी आणि शहरवासीयांसाठी भरीव योजनांची यादीच सादर करण्यात आली असून, त्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छ्ता, शहर सुशोभीकरण, कायदा सुव्यवस्था आदी महत्वपूर्ण मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.

आपल्या कामांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर आप देखील महापालिकेच्या रिंगणात उतरत आहे, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा, दिल्लीचे गव्हर्नन्स मॉडेल आणि सामान्य जनमानसाला केंद्र स्थानी ठेऊन सत्तेमार्फत मुलभूत बदल घडविण्याचे वचन देत पक्ष निवडणूक रिंगणात तयारीने उतरला आहे. प्रस्थापितांना धक्का देण्याची ताकत फक्त आम आदमी पक्षात आहे हे अधोरेखित करत समाज आणि राजकारण बदलासाठी पुढे येत स्वच्छ चारित्र्याच्या जनसामान्यांना महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचे आवाहन आपचे पिंपरी-चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

पक्षातर्फे सादर केलेल्या परिपत्रकाद्वारे इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड तथा पुणे स्थित आपच्या नेत्यांशी संपर्क साधावा, तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची देखील व्यवस्था पक्षातर्फे करण्यात आलेली आहे, अर्ज स्विकारनी नंतर इच्छुकांशी संपर्क साधण्यात येईल व पुढील उमेदवारी प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येईल असे आपचे पिंपरी-चिंचवड प्रचार प्रमुख राज चाकणे यांनी सांगितले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

ब्रेकिंग : पेट्रोल – डिझेल होणार ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय