Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड‘मिशन-२०२२’ साठी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक

‘मिशन-२०२२’ साठी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक

इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, बूथ यंत्रणेवर विशेष भर


पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली असून प्रदेश नेतृत्त्वाने स्थानिक राजकारणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे, बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला असून, ‘यंदाचा निर्धार १०० पार’, असा संकल्प करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमर  साबळे, प्रदेश  कार्यकारिणी सदस्य  सदाशिव खाडे, कायदा आघाडीचे प्रदेश सह संयोजक सचिन पटवर्धन, दक्षिण भारत आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, महिला आघाडी शहराध्यक्ष उज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आगामी निवडणूक ही पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. भाजपा शहर कार्यकारिणीने बूथ यंत्रणा मजबूत करावी. केंद्र सरकार आणि राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने केलेल्या कामांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या निवडणुकीसाठी इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू आहे. त्यांच्या विचारांना घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.

येत्या ५ जूनला कार्यकारिणीची मॅरेथॉन बैठक

पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीबाबत येत्या ५ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. त्याअनुशंगाने शहर कार्यकारिणी कामाला लागली आहे. शक्तीकेंद्र आणि यादी प्रमुखांपर्यंत सर्वांनी जबाबदारी विभागून घेतली आहे. सत्ताकाळात शहरात भाजपाने केलेल्या विकासकामांची जागृती शहरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय