Wednesday, January 22, 2025

अभिनेता रितेश देशमुख राजकारणात करणार एन्ट्री?

पुणे : पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये रितेशला ‘राजकारणात एन्ट्री करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला रितेशनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.’रितेशचं प्रेम कशावर आहे, राजकारण की सिनेमा?’असा प्रश्न नुकत्याच एका कार्यक्रमात रितेशला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत रितेश म्हणाला, राजकारण.

रितेशला मुलाखतीत विचारण्यात आलं की, तुला राजकारणात एन्ट्री करायची आहे का? यावर रितेश म्हणाला, ‘राजकारणात यायचंय असं मी म्हणालो नाही पण राजकारण हे माझं पहिलं प्रेम आहे. राजकारणा विषयी माझी आवड आणि आपुलकी आहे. ‘

तुझे मेरी कसम या चित्रपटामधून रितेशनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
मस्ती, क्या कूल है हम, हे बेबी,धमाल,हाऊसफुल्ल,एक व्हिलन यांसारख्या चित्रपटात त्यानं प्रमुख भूमिका साकारली.रितेशचा वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles