Friday, November 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविधवा महिलांना तुच्छतेची वागणूक नको, त्यांनाही मानाचा दर्जा मिळाला पाहिजे - सीता...

विधवा महिलांना तुच्छतेची वागणूक नको, त्यांनाही मानाचा दर्जा मिळाला पाहिजे – सीता केंद्रे

चिखलीत आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्ताने सन्मान समारंभ संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर – 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त आम आदमी पार्टी महिला आघाडी व संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे जाधववाडी, चिखली येथे शहर अध्यक्षा सीताताई केंद्रे यांनी शेकडो महिलांच्या उपस्थितीत प्रभागातील विधवा, एकल महिलांचा साडी व किराणा किट सप्रेम भेट देऊन सन्मान केला. याप्रसंगी सीता केंद्रे म्हणाल्या की, “पुरुष विधुर झाला तरी त्याला समाजात सहज वावरताना अडचण येत नाही, धार्मिक, सांस्कृतिक, पूजा – अर्चा, प्रार्थना समारंभात त्याला निमंत्रण दिले जाते, मात्र हाच समान दर्जा विधवा महिलांना मिळत नाही. कोणत्याही वयातील विधवा असो तिला तिच्या क्षमतेनुसार प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. गरिबी, भूकमार तिच्या वाट्याला येते, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टी दूषित असते. जागतिक स्तरावर 23 जून या दिवशी विधवा सन्मान दिवस साजरा केला जातो. विधवा महिलांना सरकारचे आर्थिक सहाय्य किरकोळ आहे. सामाजिक चळवळीच्या संस्थांच्या मार्फत त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे”.



या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार प्रमुख अतिथी होते. ते म्हणाले की, “विधवा महिलांसाठी शासनाच्या काही किरकोळ योजना आहेत, मात्र त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाही. सरकारकडे जमा होणाऱ्या करसंकलातून राखीव निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. सामान्य व हलाखीचे जीवन जगणाऱ्या हजारो महिलांच्या आर्थिक उन्नतीच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून राबवण्यासाठी सीता केंद्रे यांच्यासारख्या महिलांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले तर महिलांना स्थानिक पातळीवर न्याय मिळवून देता येईल. महाराष्ट्रात आंतराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त महाराष्ट्रात विशेष कार्यक्रम आयोजित केलेले दिसत नाहीत. अशा प्रकारचा दिलासा देणारा विधवा सन्मान कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच होत आहे.हे खूप महत्वाचे आहे”.



यावेळी विधवा महिला सन्मान समारंभात 175 महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे प्रकाश हागवणे, वैजनाथ शिरसाट, रविराज काळे तसेच ऋषिकेश, माया सांगवे, जागृती मचाले, दत्ता सांगवे, अंकुश कोटकर, तुकाराम इंगोले, विष्णू बोरोपंत, प्रभाकर इंगोले, श्रीकांत शिंदे, पांडुरंग कोटकर, शिवराज इंगोले, गजानन इंगोले, श्याम इंगोले आदी संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका तिडके यांनी केले तर आभार शिरीन शेख यांनी समारोप केला.



जागतिक योग दिनानिमित्त रहाटणीत योग शिबिर संपन्न

PCMC : पिंपरी-चिंचवडकरांच्या उपयोगकर्ता शुल्कसह वसुलीला विरोध

अभिनव विद्यालय जाधववाडी चिखली येथे २१ जून जागतिक योगदिन उत्साहात साजरा!

संबंधित लेख

लोकप्रिय