Friday, November 22, 2024
Homeग्रामीणपिंपरी येथील बलात्कार, खून प्रकरणात न्याय कधी? DYFI, जनवादी महिला संघटनेचे पोलिस...

पिंपरी येथील बलात्कार, खून प्रकरणात न्याय कधी? DYFI, जनवादी महिला संघटनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन

आरोपी अद्याप मोकाट कसा? – अपर्णा दराडे


पिंपरी चिंचवड रमाबाई नगर, पत्राशेड, पिंपरी येथील बलात्कार खून / धनश्रीला न्याय देणार कधी ?आरोपीना अटक करणार कधी ? हा प्रश्न करत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड परिमंडळ चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

                      

धनश्री पुणेकर (वय ७ वर्षे) या मुलीवर २७ सप्टेंबर २०१८ रोजी पळवून नेऊन बलात्कार करण्यात आला, तिची हत्या करून एच. ए. कंपनीच्या मैदानात तिचा मृतदेह फेकण्यात आला होता. पिंपरी पोलीस ठाणे चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर आहे.(८४८/२०१८) भादवि ३०२, ३६४, ३६६ (अ), ३५४, ३७६, २०१, ५११ आणि बाळ लैंगिक अत्याचार कायदा कलम ८,१२ नुसार गुन्हा नोंदवालेला आहे. अतिशय क्रूरपणे या बालिकेला संपवण्यात आले. धुणी भांडी काम करणारी त्या मुलीची आई आणि मोलमजुरी करणारे वडील या घटनेच्या धक्क्याने जग सोडून गेले आहेत. आणि त्यांची दोन्ही मुले नगर येथे मामा नागेश जाधव सांभाळत आहेत. अतिशय दुर्दैवी क्रूर लैंगिक अत्याचार आणि खून होऊनही आरोपी गेल्या दोन वर्षांत सापडला नाही.

धनश्री पुणेकर या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी राजकुमार उर्फ प्यारेलाल चंद्रप्रकाश कुरील रा. पाणी पुरावा, पो. बिरसिहपूर ता. धारमपूर, जिल्हा-कानपुरनगर(उत्तरप्रदेश) यास अद्याप अटक का झाली नाही. सदर आरोपी फरार का घोषित करण्यात आला? धनश्रीला न्याय देण्यासाठी आपण या गुन्ह्याची फेरतपास करून तिला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अनाथ झालेल्या दोन्ही मुलांचे सरकार कोणत्या प्रकारे पुनर्वसन करणार आहे? आदी प्रश्न उपस्थित करत न्याय देण्याची मागणी केली आहे.

निवेदनावर जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर, शेहनाज शेख, रंजिता लाटकर, तर डीवायएफआय चे सचिन देसाई, अमिन शेख, स्वप्निल जेवळे, किसन शेवते, अविनाश लाटकर, गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर यांच्या सह्या आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय