Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरुग्णालयातील दरवाढीचा फेरविचार करू - आयुक्त राजेश पाटील यांचे आश्वासन

रुग्णालयातील दरवाढीचा फेरविचार करू – आयुक्त राजेश पाटील यांचे आश्वासन

पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेचे सर्व रुग्णालये, दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा व औषध उपचाराच्या दरवाढीचा प्रस्तावाचा फेरविचार करू असे आश्वासन आयुक्त राजेश पाटील यांनी पुरोगामी संघटना पुरास्कृत नागरी समस्या निवारण समितीच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती समितीचे निमंत्रक मारुती भापकर यांनी दिली आहे.

त्यांनी आयुक्तांना स्वतंत्र निवेदन देताना स्पष्ट केले की, आपल्या पिंपरी चिंचवड शहरात 72 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. गोरगरीब कष्टकरी कामगारांची ही औद्योगिकनगरी आहे. या शहरातील गोरगरीब, कष्टकरी, नागरिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्यातून उपचार घेतात.हे उपचार अल्प दरात मिळतात. या रुग्णांमधील अतिगरीब रुग्णांच्या उपचाराचे आलेले बिलात नगरसेवक, आमदार, खासदार कार्यकर्त्यांच्या शिफारशीवर सवलत देण्यात येते.

या औद्योगिक शहरातील गोरगरीब श्रमिक आणि सामान्य जनतेस केंद्रस्थानी ठेवून औषधे, सर्वोपचार हे मोफत असावेत. ही मागणी शिष्टमंडळाने केली. शहरातील मनपा शाळांमध्ये शिकणाऱ्या 40 हजार विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय साहित्य वेळेत मिळालेले नाही. यावर निवेदनात टीका करण्यात आली आहे.

यावर्षी लोकनियुक्त नगरसेवक व मनपा पदाधिकारी नसल्यामुळे निविदेचा वाद आणि टक्केवारीचा गोंधळ न होता प्रशासकीय कारभारात तरी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सर्व साहित्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासन अद्यापही शालेय साहित्य खरेदी करू शकलेली नाही. या सर्व मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात. अन्यथा सकारात्मक भूमिका घेतली नाही तर नागरी समस्या निवारण समितीच्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन करावे लागेल याची आपण गंभीरपणे नोंद घ्यावी, असे मारुती भापकर यांनी प्रशासनास सांगितले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय