Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणवडवणी : सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजींचा वयाच्या ९४ व्या वर्षीही सायकलवरून प्रवास

वडवणी : सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजींचा वयाच्या ९४ व्या वर्षीही सायकलवरून प्रवास

वडवणी : वयाची ९४ वर्ष सरली तरीही तीच उमेद कायम ठेवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम वाघमारे गुरुजींचा अजूनही सायकल प्रवास सुरू आहे.

बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील चिखलबीड गावचे मुळ रहिवासी असणारे आणि सध्या वडवणी या शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असणारे सेवानिवृत्त हेडमास्तर श्रीराम जानोजीराव वाघमारे हे वयाने ९४ वर्षांचे आहेत. आजही ते तंदुरूस्त असून शहरांमधील दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी सर्रास सायकलचा वापर करतात. शिक्षण विभागातुन १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले. वडवणी शहरातील जनमानसांच्या नजरा आपोआप त्यांच्याकडे जातात. सतत सायकलवरून प्रवास करताना शहरातील नागरिक त्यांच्याकडे कुतुहलाने बघत असतात. 

सध्या देशात, महाराष्ट्र राज्यात आणि जिल्ह्यांत कोरोनाची भयानक परिस्थिती असताना आपण पाहतो आहोत. शासनाने वेळेचे बंधन केल्याने अनेक जेष्ठ नागरिक आपल्या नियमित व्यायामापासुन दुर दुर गेले. अनेकांना व्यायाम करणे अवघड झाल्याने मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. असे एक अनेक उदाहरणे आपण प्रत्यक्ष पाहिले आहेत. मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता वाघमारे गुरुजींनी आपल्या आवडी जोपासल्या आणि शासकीय नियमांचे पालन करुन जवळपास दोन किलोमीटर अंतरावरील सायकल प्रवासही केला. 

त्यांनी याबाबत आपले अनुभव देखील व्यक्त केले. ते म्हणाले की, मी आज वयाने ९४ वर्षाचा आहे. सेवानिवृत झालो त्याकाळी एक आवडीचे वाहन म्हणून सायकल घेतली. माझे सर्व दैनंदिन कामे आजही मी सायकलवरून प्रवास करून करतो आहे. त्यामुळे माझं शरीर देखील सदृढ राहते आणि प्रकृती सुध्दा तंदुरुस्त राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय