Monday, December 9, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : दिपक कांबळे यांच्याकडून दिव्यांग नागरिकांना शिधा वाटप

पिंपरी चिंचवड : दिपक कांबळे यांच्याकडून दिव्यांग नागरिकांना शिधा वाटप

पिंपरी चिंचवड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा येथील प्रभाग 19 मधील भाटनगर, बौद्धनगर येथे 100 दिव्यांग (अपंग ) यांना पिंपरी विधानसभा शिवसेना विभाग प्रमुख दिपक कांबळे यांच्या कडून रेशन किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख व नगरसेवक एडवोकेट सचिन भोसले म्हणाले की, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. दीपक कांबळे यांच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम पिंपरीमध्ये होतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून खरंच आनंद होतोय. मी मनापासून त्याचे कौतुक करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल. कारण की आपण समाजामध्ये वावरतो व समाजाला काही देणे लागतो याची जाण दीपक कांबळे यांना आहे. 

दिपक कांबळे यांनी दिव्यांगासाठी उपक्रम आयोजित केला आहे. खरं तर संपूर्ण शिवसेना दीपक कांबळे यांच्या पाठीमागे उभी आहे. मी ही हेच सांगतो की, भविष्यात या शहराच्या कानाकोपऱ्यात दीपक कांबळेसारखे आमचे शिवसैनिक मावळ्यांचे कार्य चालू असलेले दिसेल. दीपक कांबळे जे कार्य करत आहेत, ते कार्य पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक करणार आहे. प्रत्येक शिवसैनिक जो मला कामाला लागला आहे त्या सर्वांच्या मनात हेच आहे की, शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत पोहोचली पाहिजे, असेही भोसले म्हणाले.

कोविड काळ आपण अनुभवला आहे. त्यानंतर आता पावसाचे संकट अनुभवतोय. कोकण, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण परिसरात पूर आल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व आपले कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिक जीवाचे रान करून मदत करत आहेत. शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते. जे चांगलं काम आहे त्याची नेहमीच प्रशंसा केली पाहिजे, कारण चांगल्या कामाला जवाब प्रशंसा मिळते त्यांचा उत्साह आणखी वाढतो, असेही भोसले म्हणाले 

या कार्यक्रमाला माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, विभागप्रमुख राजेश वाबळे, माऊली बोराटे, बापू रामराव कांबळे, बाळासाहेब जाधव, नियाज भाई, जाफर भाई, जिथु नलावडे, गणेश आहेर अध्यक्ष मातोश्री संस्था, गोरख पाटील, उपशहरप्रमुख पांडुरंग पाटील, अमोल निकम, राजू परदेशी अध्यक्ष अकिल वाल्मीकी समाज पिंपरी चिंचवड शहर हे उपस्थित होते.

तर खंडू शिरसाठ, ऋषिकेश तुरुकमारे, अप्पा झडिंग ग्रुप, के. बी. बॉईज ग्रुप, वैशाली मराठे उपजिल्हाप्रमुख, ऍड. उर्मिला काळभोर शहर संघटिका, सरिता साने पिंपरी विधानसभा संघटक, अनिता तुतारे चिंचवड विधानसभा संघटक, वैशाली कुळथे पिंपरी विभागसंघटिका, शेंला पाचपुते, शेंला, अमोल निकम उपशहरप्रमुख, हाजी दस्थगिर मणियार अल्पसंख्याक आघाडी शहरप्रमुख यांच्या संयोजनाने कार्यक्रम पार पाडला.


संबंधित लेख

लोकप्रिय