Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणतहसीलदारांंचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना अवैध दारू बंद करण्याचे आदेश; सरपंच संघटनेच्या...

तहसीलदारांंचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना अवैध दारू बंद करण्याचे आदेश; सरपंच संघटनेच्या मागणीला यश



(वडवणी/प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  व उपाययोजना करण्यासाठी वडवणी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सरपंच संघटना यांची तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली यावेळी सुचना करताना सरपंच संघटना यांनी गावागावात अवैध दारू विक्री होत असल्याने मद्यपी यांची संख्या वाढत असून त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अवैध दारु विक्री बंद करा अशी सुचना केल्यावरून तहसीलदार वडवणी यांनी पोलीस निरीक्षक वडवणी यांना लेखी पत्र देऊन अवैध दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

          वडवणी तहसीलदार व सरपंच संघटना यांची तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक दि.7 जुलै रोजी पार पडली यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच संघटना यांनी तहसीलदार यांच्या कडे काही सुचना मांडल्या यामध्ये हाँटेल व पान टपरी या सर्रास सुरू असुन त्यामुळे गर्दी वाढत आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गावा गावात अवैध दारू विक्री होत असल्याने मद्यपीची संख्या वाढुन गर्दी होत आहे याची तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वडवणी यांना लेखी पत्र देऊन बीड जिल्ह्या मध्ये कोरोना विषाणुचा कोव्हीड प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि .13.03.2020 पासुन लागु करत खंड 2.3.4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेल्या आहेत . कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपणास कळविण्यात येते की , मा.जिल्हाधिकारी , बीड यांचे आदेश जा.क्र .2020 / आर.बी / डेस्क- पोल -1 / कावी . फौप्रसंकः 144 दि .30.06.2020 अन्वये जमाबंदी आदेश दि .31 जुलै , 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत जिल्हयातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला असुन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 ( 1 ) ( 3 ) अन्वये मनाई आदेश लागु करण्यात आले परंतु उक्त आदेशा मधील सुचने प्रमाणे पालन केले जात नसल्याचे सर्व सरपंच ता.वडवणी यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या दि .07.07.2020 रोजीच्या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित केले आहेत . 1.सध्या कोरोना संसर्गाचे रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असुन हॉटेल व पानटपऱ्या सर्रास चालु आहेत त्यामुळे नागरिक गर्दी करत असुन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे . 2 गावामध्ये अवैध दारु विक्री होत असुन मद्यपीची गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता बळावत आहे . तरी अवैध दारु विक्री बंद करून संबंधित गावातील बीट अंमलदार यांनी एक दिवसा आड गावात भेट देवुन ग्रामपंचायती मध्ये भेट पुस्तिका मध्ये नोंद करावी असे म्हटले आहे.यावेळी तालुक्यातील असंख्य सरपंच उपस्थित होते.

           देशासह,गावागावात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व सरपंच मिळुन हे प्रयत्न करत आहेत तरी नायब तहसीलदार कलीम शेख यांच्या आपत्ती व्यवस्थापन समिती बैठकीत काही गावच्या सरपंच यांनी अवैध दारू विक्री मुळे मद्यपीची संख्या वाढत असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी सुचना मांडली होती व अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती तरी गावा- गावातील सरपंच यांना ही पोलिसांनी विश्वासात घेऊन सहकार्य केले तर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नक्कीच मदत होईल.:- संजय आंधळे (सरपंच संघटना वडवणी तालुका अध्यक्ष)

संबंधित लेख

लोकप्रिय